HW News Marathi
Covid-19

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा चीनला स्पष्ट इशारा

नवी दिल्ली | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (१४ ऑगस्ट) भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित केले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी चीनला इशारा दिला आहे. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल”, असा स्पष्ट इशारा यावेळी राष्ट्रपतींनी दिला आहे. “संपूर्ण जग सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत असताना आपल्या काही शेजारी देशांनी विस्तारवादाचे दुःसाहस केले. सीमांचे रक्षण करतांना आपल्या वीर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले. गलवान व्हॅलीत हुतात्मा झालेल्या आपल्या जवानांना संपूर्ण देश सलाम करतो आहे”, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काय म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद ?

  • देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवे चैतन्य घेऊन येणाऱ्या असतात.
  • आपण अत्यंत नशीबवान आहोत की महात्मा गांधी या स्वातंत्र्यलढयाचे दीपस्तंभ म्हणून आपल्याला लाभले. राजकीय नेत्याबरोबरच एक संत असलेले महात्मा गांधी हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते, जे केवळ भारतातच घडू शकतात.
  • यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे सोहळे मर्यादित स्वरुपात होणार आहेत. कारण आपल्याला माहितीच आहे. सध्या संपूर्ण जग एका अत्यंत धोकादायक विषाणूचा सामना करत आहे, या विषाणूने आपले जीवनमान विस्कळीत केले आहे, आणि त्याची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे.
  • या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली. भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या.
  • या विषाणूविरुद्धच्या आपल्या लढ्यात पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे. दुर्दैवाने, या महामारीशी लढतांना त्यांच्यापैकी कित्येकांना आपले जीव गमवावे लागले.
  • या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. या संकटकाळात या सर्वांना आधार देण्यासाठी, सरकारने कल्याणकारी उपक्रमही हाती घेतले आहेत. #PMGKY ची घोषणा करत, केंद्र सरकारने कोट्यवधी लोकांची उपजीविका चालेल अशी व्यवस्था केली.
  • गरजूंना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नवाटप योजनेला आता नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून दरमहा 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. सर्व राज्यांना ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.
  • आपल्या शक्तींच्या जोरावर, आपण कोविड-19 च्या या लढ्यात इतर देशांचीही मदत केली. औषधांचा पुरवठा करण्याविषयी इतर देशांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत, भारताने पुन्हा एकदा सिध्द केले की अशा संकटकाळात, भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा आहे.
  • भारताची ही परंपरा आहे की आपण केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कष्ट करतो. ‘आत्मनिर्भर भारत’चा अर्थ म्हणजे, इतर जगापासून विलग न होता किंवा अंतर न राखता, स्वयंपूर्ण होणे.
  • संपूर्ण जग सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत असताना आपल्या काही शेजारी देशांनी विस्तारवादाचे दुःसाहस केले. सीमांचे रक्षण करतांना आपल्या वीर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले. गलवान व्हॅलीत हुतात्मा झालेल्या आपल्या जवानांना संपूर्ण देश सलाम करतो आहे.
  • कोरोना विरुद्धच्या आपल्या लढाईत, जीव आणि जीवनमान दोन्हीही महत्वाचे आहे. या संकटाचा एक संधी म्हणून उपयोग करण्यासाठी ,आम्ही अनेक आर्थिक सुधारणा केल्या. विशेषतः शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी या सुधारणा अत्यंत महत्वाच्या आहेत
  • कोरोनाच्या या साथीच्या रोगाच्या काळात आपण सर्वांनी दाखविलेल्या संयमाचे आणि शहाणपणाचे जगभरात कौतुक झाले आहे. यापुढेही आपण अशाच प्रकारे काळजी घ्याल आणि जबाबदारीने वागाल, याची मला खात्री वाटते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात एकाच दिवसात ८,८६० रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

News Desk

Covishield घेऊनही Antibodies तयार नाहीत, अदार पुनावालांविरोधात दाखल केली तक्रार

News Desk