नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१८ एप्रिल) भारताच्या कोरोना स्थितीबद्दल एक दिलासादायक बातमी सांगितली. देशातील काही भागांमध्ये सकारात्मक ट्रेन्ड येताना दिसत आहे. देशातील २३ राज्यांतील ४७ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आझळला नाही.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे देशातील एकूण १४,३७८ कोरोनाधितांपैकी ४२९१ रुग्ण हे निजामुद्दीनच्या तब्लिगी जमातीशा संबंधित आहेत. तसेच, देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यू दर हा ३.३ टक्के इतका आहे. तर ७५ वर्षापेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे.
Total no. of people cured – 1,992; cure % is around 13.85%
In last 24 hours – 991 new cases, 43 deaths
Total no. of #COVID19 cases – 14,378
Total no. of deaths – 480
– JS, @MoHFW_INDIA https://t.co/K3CLXZb13g #IndiaFightsCorona
— PIB India (@PIB_India) April 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.