HW News Marathi
देश / विदेश

लष्करातील शस्राच्या खरेदी-विक्रीत पुरोहितचा सहभाग

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्याकारवाया या लष्करी अधिकाऱ्यास शोभणाऱ्या नाहीत, असे ताशेरे गुप्तचर लष्करी विभागाच्या महासंचालकांच्या अहवालात ओढण्यात आले आहेत. यामुळे कर्नल पुरोहितला पुन्हा सेवेत रुजु होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुरोहित यांना जामीन मंजूर केल्यानंतर, त्याला पुन्हा सेवेत रूजु होण्याची इच्छा आहे. परंतु बॉम्बस्फोट प्रकरणात पुरोहित याचे नाव आल्यानंतर लष्करी गुप्तचर विभागाने (मिलिट्री इंटेलिजन्स) सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. पुरोहित याचे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी असलेले संबंधातील माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर पुरोहित हे लष्करी शस्त्रांच्या बेकायदा विक्री व्यवहारातही सहभागी असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. पुरोहित हे आर्थिक फायद्यासाठी शस्त्रे मिळविणे आणि त्यांची विक्री करणे यात सहभागी होते.सुरुवातीला ते पुण्यातील एका शस्त्रदलालाशी व्यवहार करीत असत. नंतर त्यांनी राकेश धावडे (मालेगाव खटल्यातील आरोपी) याच्याशी व्यवहार सुरू केले, असेही या अहवालात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

News Desk

देशातल्या व्यापारी संघटनांनकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक

News Desk

वाढदिवस साजरा करू नका ,रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं आवाहन !

News Desk