नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी करार प्रकरणी आज (१२ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींसह उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राफेल प्रकरणात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानींकरिता मध्यस्थी केल्याचा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्ट असून त्यांना तुरुंगात टाकायला हवे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी यावेळी केला आहे.
#WATCH Congress President Rahul Gandhi: Inn teeno maamlon pe, jo main bola – corruption, procedural & now national security, inn teeno pe karyawahi hogi. Koi nahi bachega. #Rafale pic.twitter.com/ZLZ621LAfI
— ANI (@ANI) February 12, 2019
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
- राफेल करार होण्याच्या १० दिवसांपूर्वी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
- राफेल प्रकरणी एक नवा ई-मेल समोर
- राफेल प्रकरणी नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थी केली
- चौकीदार ऑडिटर जनरल म्हणजेच कॅग. कॅगचा अहवाल हा चौकीदाराकडून,चौकीदारासाठी बनवलेला चौकीदारचा अहवाल आहे. त्या अहवालाला काहीही अर्थ नाही.
- मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड केली, गोपनीयतेचा भंग केला
- मोदी हे भ्रष्ट व्यक्ती, त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे
- आमचे काम हे लोकांना माहिती देणे, सरकारवर दबाव टाकणे.आम्ही आमचे काम व्यवस्थित करत आहोत
- आमची हवी तितकी चौकशी करा, पण राफेलची सुद्धा चौकशी व्हायलाच हवी.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.