HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींच्या हॅलिपॅडसाठी तब्बल १००० झाडांची कत्तल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१५ जानेवारी) ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या ओडिशा दौऱ्यासाठी तब्बल १००० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. दरम्यान, केवळ पंतप्रधान मोदींच्या हॅलिपॅडसाठी या झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रात याबाबतचे वृत्त आले आहे.

रेल्वे विभागाने हॅलिपॅडच्या निर्मित्तीसाठी जागा दिली असली तरी वन विभागाकडून या वृक्षतोडीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नव्हती. २०१६ साली रेल्वेच्या २.२५ हेक्टर जागेत शहरी वृक्ष लागवड कार्यक्रमादरम्यान ही वृक्षलागवड करण्यात आली होती. हॅलिपॅडसाठी कत्तल करण्यात आलेल्या या झाडांची उंची ७ फूट होती. या झाडांच्या वाढीची ९० टक्के खात्री देण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

News Desk

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलनाचे रणशिंग- बाळासाहेब थोरात.

Arati More

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk