नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या संसदीय अधिवेशनाला आज (१७ जून) सुरुवात झाली आहे. “लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते. विरोधाकांनी आकड्याचा विचार करणे सोडून द्यावे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. संसदेत विरोधकांची ताकत महत्त्वाची असते.
Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for 17th Lok Sabha, says, "The role of an active Opposition is important. Opposition need not bother about their numbers. I hope they will speak actively and participate in house proceedings." pic.twitter.com/OQfvlDxDuD
— ANI (@ANI) June 17, 2019
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. १७ व्या लोकसभेत नवीन ऊर्जा घेऊन काम करू, असे मोदी म्हणाले. आज सर्व नवीन खासदारांचा परिचय होणार असल्याची माहिती मोदींनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. विरेंद्र कुमार यांनी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. संसदेचे अधिवेशन आज १७ जूनपासून ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल.
Prime Minister Narendra Modi at the Parliament: Paksh, vipaksh se zada nishpaksh ka spirit mehtv rakhta hai. Hum aane wale 5 saloon ke liye is sadan ki garima ko upar uthane ka prayas karenge. pic.twitter.com/55upeXG3WW
— ANI (@ANI) June 17, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.