नवी दिल्ली | संसदेत राष्ट्रपीत रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (२५ जून) काँग्रेसवर जोरदार टीका केली. सभागृहात मोदी बोलताना म्हटले की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदींची तुलना करताना जीभ घसरली होती. यावर मोदींनी उत्तर देताना म्हणाले की, “आम्ही अजूनही कोणाला तुरुंगात का पाठवले नाही, असा सवाल आम्हाला विचारण्यात येत आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही उचलून तुरुंगात टाकता येणार नाही. त्यामुळे जामीन मिळाला आहे, त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, आम्ही त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कारवाई करू. कोणालाही तुरुंगात टाकण्यासाठी अयोग्य मार्ग निवडण्याची गरज नाही. कायदा आपले काम करेल असे ते म्हणाले.”
PM: We are being slammed because we didn't put some ppl in jail, this is not emergency that Govt can throw anyone in jail, this is democracy& judiciary will decide on this. We let law take its course and if someone gets bail then they should enjoy,we don't believe in vendetta pic.twitter.com/N5iEAzqykO
— ANI (@ANI) June 25, 2019
माझ्या उंचीला कोणी मोजू शकत नाही. पण आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. मी कोणाची रेषा छोटी करण्यावर विश्वास ठेवत नाही. तर आपली रेषा मोठी करण्यावर जीवन खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ असे सांगत मोदींनी काँग्रेसला आणखी एक टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. तुम्ही एवढ्या उंचीवर गेलात की पायाखालची जमीन दिसणे बंद झाले आहे. तुमची उंची आणखी वाढल्यास मला आनंदच होईल. आमचे स्वप्न उंच होण्याचे नसून मुळांशी जोडण्याचे आहे. या स्पर्धेत उलट आमच्या शुभेच्छाच आहेत, असे मोदी म्हणाले.
PM Modi: Hum kisi ki lakeer chhoti karne mein apna samay barbaad nahi karte hain, hum humari lakeer lambi karne mein zindagi khapa denge. Aap ki unchai aapko mubarak ho. Aap itna uncha chale gaye hain ki zameen dikhni band ho gayi hai, jaddon se ukhad gaye hain. pic.twitter.com/yxUuAPGADm
— ANI (@ANI) June 25, 2019
आणीबाणीवरुनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ४४ वर्षांपूर्वी २५ जून रोजी सत्तेसाठी काँग्रेसने लागू केलेली लोकशाहीसाठी काळा दिवस मानला जातो. देशाच्या इतिहासात आणीबाणीचा हा डाग कधीही मिटणारा नाही. मात्र आता जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.