HW Marathi
देश / विदेश

ऐकलत का, आता २० रुपयाचे नाणे आले

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी (७ मार्च) नव्या २० रुपयाचे नाणी सिरीज लॉन्च केली आहे. यामध्ये एक रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतच्या नाण्यांचा समावेश आहे. नवीन नाणी आल्यानतंर जुनी नाणी सुद्धा चलनात राहणार आहे. या नाण्यांची निर्मिती मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथे होणार आहे.

पहिल्यांदाच सरकारने २० रुपयांच्या नाणे आणण्याची घोषणा केली असून या नाण्याचा व्यास २७ मिमी तर वजन ८.५४ ग्राम असणार आहे. अशी माहिती अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये दिली आहे. नवीन नाण्याच्या बाहेरील बाजुला ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक आणि २० टक्के निकेल असणार आहे. तर आतील बाजुच्या रिंगला ७५ टक्के तांबे, २० टक्के झिंक आणि ५ टक्के निकेल असणार आहे. तर नाण्याच्या पुढील बाजुवर अशोकस्तंभाची निशानी असणार आहे, तर त्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल.

डावीकडे भारत आणि उजवीकडे ‘इंडिया’ असणार आहे. २०११ मध्ये चलनात आलेल्या नाण्यांबाबत अंध आणि दिव्यांगांकडून तक्रारी आल्या होत्या. यावेळी अंधांना नाणी ओळखण्यास अडचण येत होती. त्यामुळे आता नव्याने चलनात येणाऱ्या नाण्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

Related posts

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, जीवितहानी नाही

Gauri Tilekar

राफेल कराराचे सर्व लाभ थेट पंतप्रधानांना होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

News Desk

जाहीरातींमध्ये ‘पप्पू’ ऐवजी ‘युवराज’ या शब्दाचा वापर, निवडणूक आयोगाने फटकारताच बदल

News Desk