HW Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावरून संन्यास घेण्याचा विचार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार करत आहे. मोदींनी आज (२ मार्च) त्यांच्या या निर्णयाचा माहिती त्यांच्या स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून संपुर्ण जगाला दिली आहे. मोदींच्या निर्णयाने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.

मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले, “येत्या रविवारी (८ मार्च) मी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबसह मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहे. तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन.”

सोशल मीडियावर मोदींचे असंख्य फॉलोअर्स आहेत. या सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असलेल्या नेत्यांपैकी मोदी एक आहे. यामुळे मोदींची सोडले माध्यमातून संन्यास घेण्याच्या विचाराने त्यांच्या जगभरातील चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता येत्या ८ मार्चला सोशल मीडियाच्या जगातून संन्यास घेण्याच्या निर्णयावर ठाम राहणार की, पुन्हा एकदा मोदी सोशल मीडियावर सक्रिय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर मोदींचे चहातेच नव्हे तर विरोधकांनी मोठा धक्का बसला. देशाच्या राजकारण मोदी आणिमाजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांचे राजकीय शत्रुत्व आपण सर्वजण जाणता. राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट शेअर करत राहुल गांधी म्हणाले, द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही.

सोशल मीडियावर मोदींचे किती फॉलोअर्स

ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ५० मिलियन इतकी झाली. म्हणजेच ५ कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानकावर आहेत. तर फेसबूकवरही त्यांचे ४४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर मोदींचे ३५.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच युट्युबवरील ४.५ दशलक्ष सबस्क्रायबर आहेत.

Related posts

राज्यात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा

News Desk

मावळमधील पराभवामुळे फिका पडला बारामतीचा विजयोत्सव

News Desk

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk