HW Marathi
देश / विदेश राजकारण

रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाकडून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मोदींना रशियातील सर्वोच्च अशा  ‘ऑर्डर ऑफ ‘द सेंट अँड्र्यू दर अपॉस्टल’ने पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराने भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी याबाबतच्या आदेशावर सही केली आहे. रशियाच्या दूतावसाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

रशियाच्या दूतावसाने ट्विटमध्ये म्हटले की, द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि सामाजिक सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. यासाठी मोदींनी ऑर्डर ऑफ ‘द सेंट अँड्र्यू दर अपॉस्टल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. काही दिवसांपूर्वीच मोदींना सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द किंग अब्दुलअझीज साश’ देऊन गौरव केला होता. तसेच मोदींना २२ फेब्रुवारीला सेऊल हा शांततेचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.

ऑर्डर ऑफ ‘द सेंट अँड्र्यू दर अपॉस्टल’ पुरस्काराचा इतिहास

१७व्या शतकापासून रशियामध्ये हा पूरस्कार देण्यास सुरुवात झाली. पीटर द ग्रेट हा पहिला पुरस्कार मिळाला आहे. परंतु सोव्हिएत रशियाने १९१८मध्ये हा पुरस्कार बंद केला होता. यानंतर १९९८मध्ये पुन्हा एकदा हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. २०१७ मध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना हा सन्मान देण्यात आला होता.

 

Related posts

…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात ? माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल

News Desk

स्वातंत्र्य दिनी हजर रहा, सरकारी बाबूंना आदेश

News Desk

रसायन शास्राचे नोबेल जाहीर

News Desk