HW Marathi
Covid-19 देश / विदेश

अम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा आज पश्चिम बंगाल व ओडिसाच्या दौऱ्यावर

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये अम्फन चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी काल (२१ मे) पत्रकार परिषदेतून दिली. अम्फन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचे खूप नुकसान झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:  येऊन पाहणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून केले होते. या पार्श्वभूमीवर मोदींनी ट्वीट करत आज (२२ मे) पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत.

‘अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची आढावा घेण्यासाठी जाणार आहे. या काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या  वादळात आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts

कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल | सामना रोखठोक

News Desk

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk

मुंबई लोकल ऑगस्टपासून सुरू करण्याचा सरकारचा विचार

News Desk