नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींला बहुमत मिळाले. यानंतर मोदी पर्वाच्या दुस-या सत्रातील पहिले संसदेचे अधिवेशनाना आज (१७ जून) पासून सुरुवात झाली आहे निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का बसला आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था, बेरोजगारी, दुष्काळ, जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Delhi: The first session of the 17th Lok Sabha will begin today; Union Budget to be tabled on 5th July in this session of Parliament. pic.twitter.com/BMHOu656hB
— ANI (@ANI) June 17, 2019
संसदेचे अधिवेशन आज १७ जूनपासून ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सर्व पक्षांची एक बैठक रविवारी (१६ जून) आयोजित केली होती. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.