HW News Marathi
देश / विदेश

Independence Day LIVE : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

नवी दिल्ली| ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जनतेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषणाला सुरुवात केली आहे.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा आधी कवायत देखील करण्यात आली. लोकांनी देखील हा ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी मोठी प्रमाणात गर्दी केली. लाल किल्ल्यावरून होणार हे पंतप्रधान मोदी यांचे पाचवे भाषण होत आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Live Updates :

मोदींच्या भाषणाला सुरुवात.

https://www.youtube.com/watch?v=ScncNvh7vxg

  • २०१३ पर्यंत ४ कोटी नागरिक टॅक्स भरत होते, सध्या तो आकडा पावणे सात कोटीवर जाऊन पोहोचला आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही ‘भाई-भतीजा’वाद संपवला आहे.

  • कुणाचे पोट भरल्यानंतर मिळणारे पुण्य नेहमी मोठे असते, हे पुण्य देशातील प्रामाणिक करदाते कमावत आहेत.

  • २५ सप्टेंबरपासून पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करणार. देशातल्या १० कोटी कुटुंबांना (५० कोटी नागरिकांना)वार्षिक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही.

  • येत्या २५ सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, १० कोटी कुटुंबांना (५० कोटी लोक) ५ लाखांचा विमा.

  • एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत दारिद्र रेषेतून वर आलेत.

  • आयुषमान योजनेचा 10 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे.
  • 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य अभिनयाला सुरुवात करणार.

  • ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय.

  • 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल .

  • खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला .

    GST प्रत्येकाला हवा होता पण निर्णय घ्यायला उशीर होत होता, राजकारण ,लाभ ह्यांचा विचार होतात. पण देशाने हे स्वीकारले आणि व्यापाऱ्यांनीही अडचणी येऊनही त्याचा स्वीकार केला आणि पुढे गेले .

     

  • जेव्हा लक्ष विचलित होते तेव्हा समाजचे महत्त्वाचे निर्यणही वर्षानुवर्षे अडकून पडतात .
  • मोठी लक्ष्य समोर ठेऊन संकल्प करून पुढे जाण्याचा प्रयास करण्याचे आवाहन .
  • डिजिटल इंडिया उल्लेख, सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख .
  • स्वप्न मोठी हवीत, मेहनत हवी, स्वप्न मोठी नसतील तर विकास खुंटतो .
  • डिजिटल इंडिया उल्लेख, सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख
  • म्हणूनच आज देश दुप्पट महामार्ग बनवतोय तर चौपट गावात नवी घर बनवतोय , धान्य उत्पादन करतोय तर मोबाईलच उत्पादन करतोय, ट्रॅक्टर ची विक्री तर स्वातंत्र्यानंतर आज सर्वात जास्त हवाई जहाजांची खरेदी होतेय, देश आज शाळेत शौचालय बनविण्याचे विक्रम तर नवे IIT , IIN ची स्थापना , छोट्या छोट्या ठिकाणी नवे स्किल डेव्हलपमेंटचे मिशन सुरु करत आहे.
  • “देश वही, धरती हवी, हवायें वही, आस्मान वही, समुंदर वही, सरकारी दफ्तार वही, फाईले वही, निर्णय प्रक्रियाये करनेवाले लोक वही है, चार साल देश बदलाव महसूस कर रहा है, नवी चेतना, नवे संकल्प, उमंग नवी ऊर्जा महसूस कर के आज बढ रहा है !”
  • देशाच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणे ह्यासाठी समाज, सरकार, केंद्र-राज्य सरकार सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणे महत्वाचे ठरते.

  • योजनांचा उल्लेख : शौचालय, गावांत वीज पोहोचवणे (वेग नसता तर अजून एक दोन दशक आणखी लागली असती) , गॅस कनेक्शन(१०० वर्ष कमी पडली असती), ऑप्टिकल फायबर नेटवर्क (तर पिढीच्या निघून गेली असती) हि गती हा वेग प्राप्त करण्यासाठी आपण पुढे वाटचाल करतोय .

  • २०१३ नंतरला आपला देश ज्या वेगाने चालला होता आणि गेल्या ४ वर्षात ज्या वेगाने आपण जे काम झाले ते बघितले आपल्याला अश्चर्य वाटेल कि आपल्या देशाचा वेग, गती किती वाढली आहे.

  • पण आपण पुढे जातोय हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण कुठून सुरूवात केली होती याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण लक्ष दिले नाही तर आपण कुठे गेलो, कसे गेलो हे कळणार नाही.
  • राष्ट्र एक विशाल शक्ती आहे.
  • एव्हरेस्ट विजय तर खूप झाले जेव्हा मुलींनी एव्हरेस्ट वर तिरंगा फडकवला परंतु ह्या वर्षी खेड्यापाड्यातल्या आदिवासी मुलांनी तिरंगा फडकवला आणि शान वाढवली
  • आझादिचे हे पर्व आपण तेव्हा साजरा करत आहोत जेव्हा आपल्या मुली उत्तराखंड,हिमाचल, मणिपूर, तेलंगणा, अंधरप्रदेश ह्या राज्याच्या आपल्या मुलींनी सात समुद्र पार केला आणि सातही समुद्रांना तिरंग्या रंगाने रंगवून त्या परत आल्या.
  • आजचा सूर्योदय एक नवी चेतना, नवी ऊर्जा घेऊन आला आहे.
  • आज देश एका आत्मविशवासने भरलेला, स्वप्नांसाठी परिश्रमाची पराकाष्ठा करून देश नव्या उंचीवर पोहोचला आहे .
  • ७२व्या स्वातंत्र्यदिनाच्या मोदींकडून शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले, थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल-डिझेल १७ पैशांनी स्वस्त

swarit

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

News Desk

#CoronaVirus | राष्ट्रवादी अन् शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र भाजपही करणार आर्थिक मदत

News Desk