HW News Marathi
देश / विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमध्ये दाखल, होणाऱ्या पत्नीमध्येही कोरोना सदृश्य लक्षणे

ब्रिटन | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बोरिस यांच्या होणाऱ्या पत्नीमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. अद्याप सायमंड्स यांची कोरोना चाचणी करण्यात आली नसून त्या गेल्या १ आठवड्यापासून क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

जॉनसन यांना लंडनमधील सेंट थॉमस रूग्णालयात दाखल करण्यात आले असून ब्रिटनचे विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी तात्पुरत्या स्वरुपात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या होणाऱ्य पत्नीलाही लक्षणे दिसून आल्याने त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांपैकी आतापर्यंत ५०००पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. काल (६ एप्रिल) जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकड्यांनुसार, या आजारामुळे ४३९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने एक ट्वीटमध्ये सांगितलं की, ‘५ एप्रिल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या रूग्णांपैकी ५,३७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जवानांवर आझम यांचे अप्रत्यक्ष गंभीर आरोप

News Desk

दंतेवाड्यात नक्षलींनी पुन्हा एकदा घडवलेल्या रक्तपाताने हा जुनाच प्रश्न नव्याने विचारावा लागत आहे!

News Desk

मोठी बातमी ! १५० भारतीयांचं अपहरण!

News Desk