नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे आज निधन झाले. ते मृत्यू समयी ५१ वर्षांचे होते. त्यांना २० दिवसापूर्वी कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती जास्तीत जास्त बिघडत गेली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरातून त्यांच्यासाठी त्यांचे अनुयायी प्रार्थना करत होते. संपूर्ण देशभरातून भक्त त्यांच्या निवासस्थळी त्यांच्या भेटीसाठी येत होते. त्यांचे निधन झाल्यांनंतर त्यांचे अनेक अनुयायी त्यांच्या अंत्यदर्शनाला येत आहेत.
आज, दुपारी ३ वाजता, दिल्लीतील मेरठ महामार्गावरील ताराससंघमर्थात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर असल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात होते. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. फक्त जैन भक्तांना आणि शिष्यांना त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, कोणालाही आत यायला परवानगी दिली जात नव्हती. गुरुवारी त्यांची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काही अंशी सुधारणा देखील झाली होती.
जैन मुनी तरुण सागर यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु: ख झाले आहे. असे ट्विट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच जैन मुनी तरुण सागर यांच्या निधनाची बातमी ऐकून आपण अतिशय खिन्न झालो आहोत. त्यांची प्रवचने आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान यासाठी आम्ही नेहमीच त्यांचे स्मरण करणार आहोत. माझ्या संवेदना जैन समाज आणि त्यांच्या असंख्य शिष्यांसोबत आहेत.
Deeply pained by the untimely demise of Muni Tarun Sagar Ji Maharaj. We will always remember him for his rich ideals, compassion and contribution to society. His noble teachings will continue inspiring people. My thoughts are with the Jain community and his countless disciples. pic.twitter.com/lodXhHNpVK
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2018
राजनाथ सिंग यांनी देखील ट्विटरव्दारे श्रद्धांजली वाहीली आहे.
जैन मुनि श्रद्धेय तरुण सागर जी महाराज के असामयिक महासमाधि लेने के समाचार से मैं स्तब्ध हूँ। वे प्रेरणा के स्रोत, दया के सागर एवं करुणा के आगार थे। भारतीय संत समाज के लिए उनका निर्वाण एक शून्य का निर्माण कर गया है। मैं मुनि महाराज के चरणों में अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.