दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे 19 मार्च रोजी रात्री 8 वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. जगभरामध्ये तसेच देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.
PM Shri @narendramodi will address the nation on 19th March 2020 at 8 PM, during which he will talk about issues relating to COVID-19 and the efforts to combat it.
— PMO India (@PMOIndia) March 18, 2020
देशभरामध्ये सध्या कोरोनामुळे चितेंचं आणि भितीचं वातावरण पसरलेलं आहे,त्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सार्क देशांशी कोरोनासंदर्भात व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे बातचीत केली होती. आज रात्री ते भारतीयांना 8 वाजता संबोधित करतील अशी माहिती ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
याअगोदर 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजताच संपूर्ण देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी नोटबंदीसारखी मोठी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार देशातील तत्कालीन 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या आणि नव्या नोटा देशाच्या चलनात आल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.