ब्रिटन | संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहे. यात आता ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. चार्ल्स यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आहेत. प्रिंस चार्ल्स हे ७१ वर्षीय असून मात्र त्यांची पत्नी कॅमिला यांचे निपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ४२२ लोकांचा मृत्यु झाला आहे. तर ८,०७७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
Next in line to the throne, Prince Charles has tested positive for #COVID19: UK media (file pic) pic.twitter.com/QXlEcfNxpO
— ANI (@ANI) March 25, 2020
क्लेरेंस हाउसच्या मिळालेल्या माहितीनुसार सरकार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिंस आणि कामिला यांनी स्कॉटलंडमध्ये घरात स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते मागील काही दिवसांपासून सगळं काम घरूनच करत आहेत. मात्र अद्याप प्रिंस नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले यांची माहिती मिळालेली नाही. तसेच ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी देशात कोरोना व्हायरसवर नियंत्रण येण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.