नवी दिल्ली | जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी इंडिया गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यास बसल्या आहेत. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कारवाईविरोधात प्रियंका गांधी आंदोलन करत असून सांयकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.
Priyanka Gandhi Vadra, Congress in Delhi: Prime Minister should answer on what happened at the University yesterday, whose government beat up the students? He should speak on the sinking economy. His party MLA raped a girl, why hasn't he spoken on it? pic.twitter.com/rQG84yiMtq
— ANI (@ANI) December 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (१५ डिसेंबर) जामिया विद्यापीठात काय घडते. विद्यार्थ्यांना मारहाण का केली ?, मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले पाहिजे. तसेच मोदींच्या पक्षातील एक आमदार मुलीवर बलात्कार करतो, यासंदर्भात मोदी मौन का?, असे अनेक सवाल प्रियंका गांधी वाड्रा मोदींना विचारले आहे.
Priyanka Gandhi Vadra, Congress: Every person in Congress will fight against this tyranny and stand with the students. https://t.co/zThcd2bNHZ
— ANI (@ANI) December 16, 2019
प्रियंका गांधींनी ठिय्या आंदोलनानंतर बोलताना त्या म्हणाल्या, ” देशातील वातावरण बिघडले आहे. पोलीस विद्यापीठांमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारत आहेत. घटनेची मोडतोड केली जात आहे. आम्ही घटनेसाठी लढणार आहोत, ” असे प्रियंका गांधींना सांगितले. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी सुद्धा एक आई आहे, लायब्ररीतमध्ये पोलिसांनी प्रवेश करत, विद्यार्थ्यांना बाहेर कढून त्यांला मारणे हा भाजप सरकारचा अत्याचार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.