नवी दिल्ली | लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (२८ जून) तसेच जम्मू-काश्मीर आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भातील प्रस्तावासह जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी ६ महिन्यांसाठी वाढविण्यात यावा असे २ प्रस्ताव मांडले होते. दरम्यान, अमित शाह यांनी मांडलेले हे दोन्ही प्रस्ताव लोकसभेत पास झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. हे दोन्ही प्रस्ताव राज्यातील जनतेच्या हितासाठीच असल्याचे अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
Lok Sabha approves the statutory resolution to extend President's rule in Jammu & Kashmir for a further period of 6 months with effect from 3rd July, 2019. https://t.co/j4ZKEs6srl
— ANI (@ANI) June 28, 2019
अमित शाह यांनी मांडलेल्या जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध दर्शविला होता. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी २ जुलैपासून जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविण्याच्या अमित शहांच्या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, अखेर लोकसभेत हा प्रस्ताव पास झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.