HW News Marathi
देश / विदेश

पीएसआयचा गळा चिरला, बोटे कापली

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच उत्तर प्रदेशातही तशीच घटना घडली आहे. काही हल्लेखोरांनी पीएसआय शहजोर सिंह यांचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये असलेल्या बालावाली पोलीस ठाण्यात उप निरीक्षक म्हणून शहजोर सिंह कार्यरत होते. मात्र काही समाजकंटकांनी त्यांची गळा चिरून हत्या केली. एवढंच नाही तर त्यांचा मृतदेह जवळच्याच शेतात फेकला आणि त्यांची बंदुक घेऊन तिथून पोबारा केला. शहजोर सिंह मंडावर पोलीस ठाण्याकडून बालावली पोलीस चौकीकडे जात असताना हा प्रकार घडला आहे. शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत. तसेच त्यांची बोटांवर कापण्याच्या खुणा आहेत. बालावली पोलीस ठाण्यात सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत होते. एका बंद पडलेल्या काचेच्या फॅक्ट्रीजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचीही माहितीही मिळते आहे. एका प्रत्यक्षदर्शीने एक मृतदेह शेतात पडला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच तातडीने पंचनामा केला. एप्रिल-मे महिन्यात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तरप्रदेशात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा आलेख १९५ टक्क्यांनी वाढला आहे.

शहाजोर सिंह यांची हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांवरच्या हल्ल्यांच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंचे पीए,चालक कोरोनामुक्त ! मुंडेंसुद्धा दोन दिवसांत कोरोनामुक्त होतील…

Arati More

पत्नीवर 30 वेळा चाकूने वार करून खून, आरोपी पती अटक

News Desk

आझमगड सीमेवर उर्जामंत्री नितीन राऊत यांची पोलिसांनी गाडी अडवत त्यांना घेतले ताब्यात

News Desk