HW Marathi
देश / विदेश राजकारण

पॉंडिचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत ठरले अपयशी

पाँडिचेरी | पॉंडिचेरीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ६ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना आज (२२ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले आहे.

मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले आहे.पाँडिचेरी विधानसभेत काँग्रेसला आपले बहुमत सिद्ध करता आले नाही. सोमवारी सभापतींनी जाहीर केले की सरकारकडे बहुमत नाही. यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचा निरोप निश्चित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभेत काँग्रेसकडे ९ आमदारांसह २ डीएमके आणि एक अपक्षाचा पाठिंबा आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. म्हणजेच काँग्रेसला ११ आमदारांचा (सभापतींना धरुन १२) पाठिंबा आहे, तर विधानसभेच्या सद्यस्थितीनुसार बहुमतासाठी १४ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. तथापि, फ्लोअर टेस्टच्या आधी मुख्यमंत्री नारायणसामी यांनी बहुमत असल्याचा दावा केला होता.

Related posts

एल्गार परिषदेत महत्वाची भूमिका असलेल्या २ जणांना अटक

News Desk

पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!!

News Desk

मुंढेच्या बदलीचा आनंद व्यक्त करणे नाशिक महापौरांना पडणार महागात

News Desk