HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील २ सुपुत्रांचा समावेश

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८जवान शहीद झाले असून २० हूनही अधिक जवान जखमी झाले आहेत. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या २ सुपुत्रांचा समावेश आहे. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील जवानांवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड हे २ जवान हा हल्ल्यात शहीद झाले आहेत.

जैश ए मोहम्मद या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. अतिरेकी आदिल अहमद डाल याने हा हल्ला घडवून आणला आहे. गेल्याच वर्षी आदिल अहमद डाल हा या दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल

News Desk

Republic Day | इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा

News Desk