नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करीत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी संपूर्ण देशातून असंख्य लोक पुढे येत आहेत. अनेक सेलेब्रिटींसह सर्वसामान्यांनकडूनही मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही समाजकंटकांकडून मदत करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहे. गृहमंत्रालयाकडून याबाबतची माहिती समोर आली आहे.
It is also reported that some unscrupulous elements are soliciting contributions from people through other accounts.
It is advised that people desirous of supporting families of martyrs of CAPFs should only contribute through the website – https://t.co/wkuXoWnRJL— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) February 16, 2019
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ज्याद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. “काही समाजकंटकाद्वारे खोटी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. त्याच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र अशा कुठल्याही लिंकवर जाऊन मदत करु नये”, असे आवाहन करण्यात राजनाथ सिंह यांनी केले आहे. तुम्हाला शहिदांच्या कुटुंबियांना मदत करायची असेल तर ‘भारत के वीर’ नावाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती मदत करु शकता. त्याचप्रमाणे मदत करण्यापूर्वी ती योग्य ठिकाणी पोहचत आहे का ?, हे तपासून पहा.
The Bharat Ke Veer @BharatKeVeer is a trust into which public can contribute voluntarily to support the families of martyrs of Central Armed Paramilitary Forces – @BSF_India , @crpfindia , @CISFHQrs , @ITBP_official , @NDRFHQ , @nsgblackcats , @DGSSB and @official_dgar.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) February 16, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.