HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack | मातृभूमीसाठी जम्मूतील डॉक्टरांनी घेतली ‘ही’ प्रतिज्ञा

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ‘जम्मू डॉक्टर असोसिएशन’ने देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमधील युद्ध सदृश्य परिस्थिती पाहता या असोसिएशनमधील डॉक्टरांनी मातृभूमीसाठी जवानांसोबत खाद्यांला खांदा लावून स्वेच्छेने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. “युद्ध असो किंवा एखादी मोठी आपत्ती…मातृभूमीसाठी आम्ही सदैव स्वेच्छेने काम करत राहू अशी आम्ही प्रतिज्ञा करतो. त्यामुळे आम्हाला स्वेच्छेने काम करण्याची परवानगी द्यावी”, अशी प्रतिज्ञा या डॉक्टरांनी घेतली आहे.

‘जम्मू डॉक्टर असोसिएशन’ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमधील युद्ध सदृश्य परिस्थिती पाहता या असोसिएशनमधील डॉक्टरांनी मातृभूमीसाठी जवानांसोबत आम्ही देखील खाद्यांला खांदा लावून स्वेच्छेने काम करू अशी प्रतिज्ञा घेतली आहे. जवानांसोबत स्वेच्छेने काम करण्यासंदर्भात जम्मू डॉक्टर असोसिएशनेने जम्मू काश्मीरच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पत्र देखील पाठविले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केलेल्या हल्लात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यानंतर देशभरातून भारतीय सैन्यातील जवानांना, जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला.

“पुलावामा हल्ल्यानंतर येथील परिस्थिती फार गंभीर झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी कर्फ्यू आहे. ही परिस्थिती पाहता आमच्या असोसिएशनने जवानांसोबत स्वेच्छेने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ऑर्थोपेडिक, अ‍ॅनेस्थेशिया आणि सर्जन डॉक्टरांचा समावेश आहे”, असे जम्मूतील डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. बलविंदर सिंग यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

swarit

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit

कोरोनामूळे नाईलाजास्तव घरी बसलेल्या रेल्वेतील कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार मिळणार

swarit