जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरु होती. ही बैठक समाप्त झाल्यानंतर आता राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.
Delhi: The meeting of the Cabinet Committee on Security, on #PulwamaAttack has concluded. Home Minister Rajnath Singh to soon leave for Srinagar, J&K.
— ANI (@ANI) February 15, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.