नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह हे नुकतेच श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी आता याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आता ही आतंकवादाविरोधातील लढाई आणखी तीव्र होणार आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
#WATCH PM Modi says, "Main aatanki sangathanon ko kehna chahta hun ki woh bahut badi galti kar chuke hain, unko bahut badi kemaat chukani padegi." pic.twitter.com/XBL9YLZrVC
— ANI (@ANI) February 15, 2019
Prime Minister Narendra Modi: I pay tribute to soldiers who lost their lives in #PulwamaAttack. Our security forces have been given full freedom. We have full faith in their bravery. pic.twitter.com/kXtK3GyV70
— ANI (@ANI) February 15, 2019
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
- आतंकवादाविरोधातील लढाई आता आणखी तीव्र होणार.
- आतंकवाद्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल
- लोकांचे रक्त उसळत आहे.
- लोकांचा राग, त्यांच्या भावना योग्य आहेत
- देश एकत्रितपणे याचा सामना करीत आहे
- राजकारण बाजूला ठेऊन लोकांनी एकत्र यावे.
- हल्लेखोरांना त्याची मोठी शिक्षा मिळणार, त्यांची गय केली जाणार नाही
- पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर साधला निशाणा
- दहशतवादाविरोधात जगातील सर्व देश एकत्र होतील
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.