HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ दर्जा काढून घेणार

जम्मू-काश्मीर। जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आणि या भीषण हल्ल्याची गंभीर दखल घेत मोदी सरकारने पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे – सामना अग्रलेख

News Desk

ठरलं! तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार पदाची शपथ

News Desk