HW Marathi
देश / विदेश राजकारण

#PulwamaAttack : भारताच्या इतिहासातील जवानांवरील ‘हे’ सर्वात मोठे हल्ले

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवावा हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) एक वर्षपूर्ण होत आहेत. हा हल्ला भारतावरील सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पुलवामामध्ये सीआरपीफच्या करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी स्वीकारली आहे. पुलवामा हल्ल्यापुर्वी भारतावर झालेले मोठे हल्ले खालील प्रमाणे

यापूर्वी झालेले काही भीषण दहशतवादी हल्ले

२७ एप्रिल २०१७- कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला

कुपवाड्यातील पंजगाम येथे लष्कराच्या कॅम्पवर २७ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ भारतीय जवान शहीद झाले होते तर २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले होते.

५ जून २०१७ – बंदीपोरातील संबलमध्ये सीपीआरएफच्या कॅम्पवर हल्ला

बंदीपोऱ्यातील संबळमधील ५ जून २०१७ रोजी सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराने ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

सप्टेंबर २०१६ – उरीच्या तळावर भीषण दहशतवादी हल्ला

२०१६ मध्ये उरीच्या लष्करी तळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात जवानांना ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आले होते. उरीचा हल्ला हा तब्ब्ल २० वर्षांनंतर भारतीय लष्करावर करण्यात आलेला सर्वात मोठा हल्ला होता. जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी झोपेत आणि निःशस्त्र असलेल्या जवानांवर हल्ला केला होता.

२९ नोव्हेंबर २०१६ – नगरोटामध्ये लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील लष्कराच्या तळावर २९ नोव्हेंबर २०१६ ला दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे ७ जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते.

Related posts

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk

लादेनला मारले जाते तर काहीही शक्य आहे, जेटलींचे अत्यंत मोठे विधान

News Desk

भारतात घुसखोरी करण्यासाठी ३०० दहशतवादी प्रयत्नशील | लष्करप्रमुख

News Desk