HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील जवानांवरील सर्वात मोठा हल्ला

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात सुरक्षा जवानांच्या ७८ वाहनांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून घडविण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर हादरले आहे. या हल्ल्यात तब्बल ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आल्याचा हा पहिलाच आत्मघाती प्रकारचा हल्ला आहे. संपूर्ण देशभरातून या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा अशी मागणीही जोर धरत आहे.

यापूर्वी जवानांवर झालेले काही भीषण दहशतवादी हल्ले

२७ एप्रिल २०१७- कुपवाड्यातील पंजगाममध्ये सेनेच्या लष्करी कॅम्पवर हल्ला

कुपवाड्यातील पंजगाम येथे लष्कराच्या कॅम्पवर २७ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ भारतीय जवान शहीद झाले होते तर २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले होते.

५ जून २०१७ – बंदीपोरातील संबलमध्ये सीपीआरएफच्या कॅम्पवर हल्ला

बंदीपोऱ्यातील संबळमधील ५ जून २०१७ रोजी सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराने ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

सप्टेंबर २०१६ – उरीच्या तळावर भीषण दहशतवादी हल्ला

२०१६ मध्ये उरीच्या लष्करी तळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात जवानांना ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आले होते. उरीचा हल्ला हा तब्ब्ल २० वर्षांनंतर भारतीय लष्करावर करण्यात आलेला सर्वात मोठा हल्ला होता. जम्मू-काश्मीरमधल्या उरी सेक्टरजवळच्या एलओसीजवळच्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी झोपेत आणि निःशस्त्र असलेल्या जवानांवर हल्ला केला होता.

२९ नोव्हेंबर २०१६ – नगरोटामध्ये लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील लष्कराच्या तळावर २९ नोव्हेंबर २०१६ ला दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर लष्कराचे ७ जवान शहीद झाले होते. या हल्लात दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार

News Desk

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

Gauri Tilekar

सालाबादप्रमाणे CBSE१० वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी !

News Desk