नवी दिल्ली | पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१६ फेब्रुवारी) बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये संपन्न झाली आहे. या बैठकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी एकजूट करून दहशतवादाविरोधात लढा द्याला हावी. तसेच दहशतवाद्यांविरोधात लढाई देण्यासाठी सरकारबरोबर सर्व विरोधी पक्ष देखील एकत्र राहण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
The resolution passed at the all-party meeting: We strongly condemn the dastardly terror act of 14th February at Pulwama in J&K in which lives of 40 brave jawans of CRPF were lost. pic.twitter.com/0OjGkgS6He
— ANI (@ANI) February 16, 2019
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना शहीद झाले असून त्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.