नवी दिल्ली | “काँग्रेस आणि विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भारतीय सुरक्षा दलासोबत आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या हल्ल्याच्याबाबतीत सरकारकडून कारवाईचे जे निर्णय घेतले जातील त्यांना आमचा पाठिंबा असेल. भारतीय जवानांवरील हल्ला हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य आहे. कोणीही या देशाला विभाजित करू नाही”, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Congress President Rahul Gandhi: This is a terrible tragedy. This type of violence done against our soldiers is absolutely disgusting. We are all standing together with our jawans. No force can divide or break this country. #PulwamaAttack pic.twitter.com/p3up6d9AnQ
— ANI (@ANI) February 15, 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या हल्ल्याविषयी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राला आणि सुरक्षा दलाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (१५ फेब्रुवारी) श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरु होती. ही बैठक समाप्त झाल्यानंतर आता राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.