HW Marathi
देश / विदेश

‘या’ स्मार्ट फोन मध्ये होते सर्वाधिक रेडिएशन

मुंबई | भारत ही स्मार्टफोनची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झालंय की मोबाईलमधून होणाऱ्या रेडिएशनच्या (किरणांचे उत्सर्जन) उत्सर्जनामुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो. परंतु आपण मोबाईल घेताना फिचर्स आणि इतर माहिती घेतो, परंतु कोणीही आपल्या मोबाईलमधून किती रेडिएशन बाहेर पडते हे आपण माहिती करून घेत नाही

रेडिएशन एका मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्यापासून विविध आजार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन (डीओटी)ने मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनची मर्याद ठरवली आहे. रेडिएशनची मर्यादा भारतात SAR 1.6W/kg इतकी आहे. जर्मन फेडरल ऑफिस रेडिएशन प्रोटेक्शनने सर्वात जास्त रेडिएशन उत्सर्जन करणाऱ्या स्मार्टफोनची यादी जाहीर केली आहे. यात तुमचा तर फोन नाही ना एकदा पाहून घ्या…

  • शाओमीच्या एमआय ए 1 (Xiaomi MI A1) या सर्वोत्तम स्मार्टफोनमधून सर्वाधिक म्हणजे मर्यादेपेक्षाही जास्त रेडिएशन होते. यातून SAR 1.75 W/kg इतके रेडिएशन उत्सर्जित होते.
  • दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारा वनप्लस 5टी (OnePlus 5T) हा फोन असून यातून SAR 1.68 W/kg एवढे रेडिएशन उत्सर्जित होते.
  • शाओमीचा एमआय मॅक्स थ्री (Mi Max 3) या फोनमधून हिंदुस्थानमध्ये आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा थोडे कमी म्हणजे SAR 1.58 W/kg एवढे रेडिएशन उत्सर्जन होते.
  • युवा वर्गात पॉप्युलर असलेल्या वनप्लस 6टी (OnePlus 6T) यातूनही मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर पडले. यातून SAR 1.55 W/kg एवढे रेडिएशन उत्सर्जन होते.

Related posts

उत्तरप्रदेशच्या “प्लॅस्टिक बेबी”वर अमेरिका करणार उपचार

News Desk

व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा, स्मृती इराणी यांच्याकडे पदाभार

News Desk

‘गुगल प्लस’ सेवा बंद करणार, ही आहेत कारणे

Gauri Tilekar