HW News Marathi
देश / विदेश

उन्नाव सामूहिक बलात्कार अपघात की घातपात, राहुल-प्रियांकाचे भाजपवर टीकास्त्र

उत्तर प्रदेश | उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पीडितेची वकील यांचा रायबरेली येथील अतरुआ गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. यात अपघातात पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रॉ यांनी भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

“बेटी बचाओ बेटी पढाओ या भारतील महिलांना सुरक्षितीत करण्यासाठी सरकारने ही मोहिमे राबविली. मात्र, एकाद्या भाजपच्या आमदारांनी तुमच्यावर बलात्कार केल्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही,” असे ट्वीट राहुल गांधी करत भाजपवर टीकास्त्र केले आहे. प्रियांका गांधी वॉड्रा यांनी ट्वीट करत म्हटले की, “उन्नाव समूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयचे चौकशी कुठपर्यंत आली आहे. आरोपी भाजपमध्ये काय करतोय?, पीडित आणि साक्षीदारांच्या सुरक्षेत बेजबादार का?, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित करत उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत.”

भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून २०१७7 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणात सीबीआयने सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेले आरोपपत्र दाखल केले आहे. कुलदीपने पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (८ एप्रिल २०१८) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३६३ (अपहरण), ३६६ (महिलेचे अपहरण), ३७६ (बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : आत ५ मार्चला होणार पुढील सुनावणी

News Desk

मोदी सरकार २.० : आजपासून पहिले अधिवेशन सुरू

News Desk

या मराठमोळ्या शिल्पकाराने घडविले स्टॅच्यू ऑफ युनिटी

Gauri Tilekar