HW News Marathi
देश / विदेश

Live Updated Budget 2020 | बेरोजगारीच्या मुद्द्यावर कुठलीच ठास तरतूद नाही, राहुल गांधींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | देशाचे अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर करणार आहेत. काल (३१ जानेवारी) २०१९-२० च्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत विकासदरात तसेच कररचनेतही बदल होणार असल्याचे काल सादर केलेल्या सर्वेक्षणातून समजते. तसेच आगामी २०२०-२०२१ या वर्षात नवीन नोकरीची संधीही उपलब्ध होणार असल्याचीही माहिती या अहवालातून मिळाली. आता या वर्षी अर्थसंकल्पातून कोणत्या वर्गाला दिलासा मिळणार, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास कितपत मदत होईल याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शिवाय मोदी सरकारमध्ये सध्या निर्मला सितारमण यांच्या खाते बदलच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच अनेक बैठकांमध्ये सितारमण यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय आहे. हे ही जाणणे तितकेच महत्त्वाचे आहे. आरएएसने नव्या अर्थमंत्र्यांची नेमणूक करण्याची मागणी सातत्याने केली होती त्यामुळे निर्मला सितारमण यांचे हे शेवटचे अर्थसंकल्प असणार का हे पाहणेही तितकेत महत्त्वाचे आहे. २०१९ पासून अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारीला सादर व्हायला लागला पण याआधी तो ३१ मार्चला सादर होत होता. मागच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत जीएसटीत काही बदल होणार का, शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये काय बदल होणार हे ही पाहणे महत्वाचे आहे.

Live Updated

 

  • बेरोजगाराच्या मुद्यावर कुठलाच उपाय नाही, तर कर रचनेला अजून क्लिष्ट केले आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतगुंतीचा केला, अर्थसंकल्पानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • शेअर बाजार ६५० अंकानी कोसळला

  • ५ लाखांपर्यंत्याच्या उत्पन्नावर कुठलाही टॅक्स नाही, अर्थ मंत्र्यांकडून करदात्यांना मोठा दिलासा
  • ५ ते ७. ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता १५ टक्के कर, १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर
  • १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
  • १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार

  • नव्या कंपन्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स १५ टक्के,
  • येत्या वर्षात १० टक्के विकासदर गाठण्याचा उद्देश

  • एलआयसीमधील भागिदारी विकण्याचा सरकारचा प्रस्ताव
  • आयडीबीआय बँकेचा हिस्साही सरकार विकण्याचा प्रस्ताव

  • एलआयसीमध्ये सरकार गुंतवणूक करणार
  • १५ व्या वित आयोगाचा पहिला अहवाल आला
  • बँकाच्या ५ लाखांच्या ठेवीवर विमा सुरक्षा
  • बँकासाठी ३ लाख ५० हजार कोटींची निधी
  • १० सरकारी बँकांना बदलून ४ बँका करणार
  • बँकामधील भरती प्रक्रिया बदल होणार
  • कंपनी कायद्यामध्ये काही सुरधारणा नाही,
  • करदात्याचा कसलाही छळ होणार नाही,
  • जी- २० परिषदेते भारतात आयोजन, या परिषदेसाठी १०० कोटींची तरतुद

  • राष्ट्रीय सुरक्षेला सरकारचे पहिले प्राध्यान
  • स्वच्छ हवेसाठी ४ हजार ४०० कोटींची तरतूद, कार्बन उत्सर्जन करणारे थर्मल प्लॅट बंद होणार

  • आहमदाबादमध्ये समुद्री संग्रहालय उभारणार
  • सांस्कतिक खात्यासाठी ३१५० कोटींची तरतूद
  • झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार
  • २ हजार ५०० कोटी रुपये पर्यटन विकासाठी सरकार खर्च करणार
  • देशाच्या पर्यटन वाढीसाठी खास प्रयत्न
  • एसटी-एससीच्या कल्याण योजनेसाठी ८६ कोटींची तरतूद

  • जेष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी ९ हजार ५०० कोटींची तरतूद
  • महिलासाठी ३५ हजार ६०० कोटींची तरतूद
  • मुंबई शेअर मार्कोट १०० अंकांनी घसरला
  • महिलांच्या पोषण आहारावर सरकारचा भर, पोषण आहारासाठी ३५ हजार ६०० कोटींची तरतूद
  • महिलांच्या आरोग्यात मोठी सुधारणा
  • बालविवाहचे प्रमाण कमी झाले
  • खासगी क्षेत्रात डेटा सेंटर उभारण्यासाठी प्रोत्सहान
  • मुलांच्या तुलनेत मुलींचा शिक्षणाचा टक्का वाढला आहे.
  • महिलांच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये- सीतारामण
  • बेटी बचाव, बेटी पढाव योजनेला चांगले यश

  • डेटा सेंटर तयार करून डिजीटल कनेक्टिव्हिट
  • १ लाख ग्रामपंचायती ‘भारत नेट’ योजनेद्वार जोडणार, यासाठी ६ हजार कोटींची तरतूद
  • नॅशनल गॅस ग्रीड २७ हजार किलोमीटरपर्यंत वाढविणार
  • ग्रामीण भागात इंटरनेचे जाळे उभारण्यावर भर देणार
  • घरात स्मार्ट मीटर बसणार, तीन वर्षात जुने मीटर बसवणार
  • अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटींची तरतूद
  • नवीन विमानतळांची निर्मिती करणार, ‘उडान’ योजने अंतर्गत १०० नवे विमानतळ उभारणार
  • पीपीपी मॉडेलवर रेल्वे चालवणार, रेल्वेच्या खासगीकरण
  • तेजय एक्स्प्रेस सारख्या गाड्यानीं नवे पर्यंटन केंद्र जोडू
  • ५५० रेल्वे स्टेशनवर वाय फाय सुविधा उपलब्द करून देणार
  • २००० किलोमीटरचे किनारी रस्ते तयार केले जाणार
  • देशभरात ९ हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर
  • दिल्ली-मुंबई एस्प्रेसवे २०२३पर्यंत पूर्ण होणार
  • गुतंवणूक सुलभ व्हावीसाठी इन्व्हेसमेंट
  • उद्योगांसाठी २७ हजार ३०० कोटींची तरतूद
  • पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद
  • पीपीपी मॉडेलद्वारे नवीन शहराची निर्मिती होणार
  • मेक इन इंडिया प्रमाणे स्टडी इन इंडियाची सुरुवात
  • शिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटींची तरतूद, गुंतवणूक सुलभ करण्यासाठी विषेश सेलची निर्मिती करणार

  • डिप्लोमासाठी २०२१पर्यंत नव्या शिक्षण संस्था उभारणार
  • उच्च शिक्षणासाठी मोदी सरकार विषेश प्रयत्न करणार
  • राष्ट्रीय पोलीस विद्यापीठांचा प्रस्ताव
  • नवीन वैद्यकीय महाविद्यालयची निर्मिती करणार
  • स्थानिक स्वराज संस्थांनी नव्या अभियंत्यांना संधी द्यावी
  • २० लाखपर्यंत शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येणार
  • स्वच्छ भारत योजनेसाठी १२ हजार ३०० कोटीची तरदूद करणार
  • नवी शिक्ष धोरणाची लवकर घोषणा करणार
  • आयुष्यमान योजनेत २०० रुग्णालय जोडली जाणार
  • ११ कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ, धनलक्ष्मीला धान्यलक्ष्मी करण्याचा मानस
  • दूधाचे उत्पादन वाढीवर भर देणार
  • मासे उत्पादन२०० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट
  • शेतकऱ्यांसाठी १५ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद
  • महिला बचत गटांना प्रोत्सहान देण्यासाठी, कृषी उडान योजना सुरू करणार
  • ६.११ शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ – सीतारण
  • शेतकरी महिलांसाठी सरकारची विशेष योजना
  • २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट
  • पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सिंचन योजना आणार – सीतारमण
  • पंतप्रधान किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचण्यास मदत
  • सौर ऊर्जेवर शेतर पंप सुरू केले,
  • “हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे, हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा, नवजवनों के गर्म खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन”
  • विविध प्रकराच्या पेन्शन योजना लवकरच नागरिकांपर्यंत पोहचणार
  • प्रत्येक घरी स्वच्छ पाणी पोहोचवण्यास सरकारला यश
  • १ एप्रिलपासून जीएसटीला नवे स्वरूप येणार, जीएसटी एक ऐतिहासिक प्रणाली आहे -सीतारण
  • आरोग्य, शिक्षण, नोकरी हे मुद्दे देशाच्या केंद्र स्थानी आहेत- सीतारमण
  • २००६ ते २०१६ या काळात लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलेः
  • देशातील जनतेची सेवा करण्यासाठी आमच्या सरकारने एक देश एक कर कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत असून नुकतीच त्याने १ लाख कोटींचा आकडा पार केला आहे. जीएसटी कौन्सिलकडून लोकांच्या समस्या ऐकल्या जात आहेत.

  • लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या सरकारला बहुमत मिळाले, २०१९ चा निकाल आमच्या धोरणांवर दिलेला लोकांचा जनादेश आहे. लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे, त्यामुळे हा बजेट देशाच्या आशा-आकांक्षाचे बजेट आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्प-२०२० ला मंजुरी
  • सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना अरुण जेटली यांना श्रद्धांजली .
  • निर्मला सीताराण यांचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवातअर्थसंकल्पांच्या प्रती संसद परिसरात आणल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या डॉग स्कॉडकडून सुरक्षेची पाहणी

  • अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स १४० अंकांनी, तर निफ्टीमध्ये १२६.५० अंकांची घसरण
  • शेअरबाजाराची सुरुवात पडझडीने, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच प्री-ओपनिंगला शेअर बाजारा १०० अंकांनी कोसळला.
  • केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहचल्या, निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या कारकिर्दीतला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना केली.
  • केद्रीय अर्थसंकल्प असल्याने मुंबई शेअर बाजार शनिवार असला तरी आज सुरूच राहणार आहे.
  • सीतारामण आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडला जाणार अर्थसंकल्प

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प २०२०-२१
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk

शेअर बाजार १२०० अंकाने कोसळला

News Desk

धक्कादायक ! भाजपच्या खासदाराचा संशयास्पद मृत्यु

News Desk