HW News Marathi
देश / विदेश

राहुल यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्याला मसूद अझहर ‘जी’ म्हणाले

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी स्वत:ची कोंडी केली आहे. सोमवारी(११मार्च) दिल्लीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ अध्यक्षांच्या संमेलनामध्ये बोलताना राहुल यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझहर याचा आदराने उल्लेख करत मसूद अझहर’जी’ असे म्हटले. यामुळे राहुल यांनी नवीन वाद ओडून घेतला आहे.

राहुल यांच्या या विधानानंतर भाजपसह सर्वच स्थरातून कडाडून टीका केली आहे. राहुल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना चुकले. ‘पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या बसवर हल्ला कोणी केला? जैश-ए-मोहम्मद… मसूद अझहरने. ज्याला भाजप सरकारने सोडले अजित डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. मग ते विमानात बसून मसुद अझरजींना सोडवण्यास कसे गेले होते?’, असे म्हणत राहुल गांधी यांनी मसुद अझरचा उल्लेख ‘जी’ असा आदरार्थी केला.

भाजपचे राहुल गांधींवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांना भान राहिले नाही, अशा शब्दात भाजप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली. पुढे स्मृती अशा देखील म्हणाल्या की, राहुल गांधी आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक साम्य आहे असे म्हटले आहे. ते साम्य म्हणजे दहशतवाद्यांबद्दल वाटणारे प्रेम आहे असे ट्विट स्मृती इराणी यांनी खडेबोल सुनावले आहे.

 

दहशतवाद्यांना आदर करणे काँग्रेसची जुना परंपरा

‘कम ऑन राहुल जी! पहिल्यांदा दिग्विजय सिंह यांनी ओसामा जी, हाफिज सईद साहेब असे म्हणाले होते. आता तुम्ही तर मसूद अझहर ‘जी’ असे म्हणालात. काँग्रेस पक्षाला नेमके झाले तरी काय?’, असे ट्वीट करत केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

काँग्रेसचे सारवासारव करत भाजपवर निशाणा

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने सर्व स्थरातून त्यांच्यावर टीकेची झोड उटली आहे. काँग्रेसने स्पष्टीकरण देत भाजप आणि मोदी (गोदी) समर्थकांना दोन प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस नेते सुरजेवाला यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मसूद अझहरची सुटका करण्यासाठी गेले नाही का? पठानकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी मोदींनी आयएसआयला बोलावले नाही का? असे सवाल केले आहेत. भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

News Desk

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

News Desk

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १००० कोटींच्या मदत निधीची घोषणा!

News Desk