नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. २ दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा देखील रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले राहूल गांधी?
कोरोना सदृश्य लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही कोरोना
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.