नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने एका दिवसात ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशाने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली. यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब आहे, असे ते म्हणाले आहेत.
20 लाख का आँकड़ा पार,
ग़ायब है मोदी सरकार। https://t.co/xR9blQledY— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2020
“कोरोनाबाधितांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरून करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी यापू्वी एक ट्विट करत १० ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसंच यासाठी सरकारला ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे म्हटले होते.h
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.