HW News Marathi
Covid-19

राहुल गांधीचा मोठा निर्णय! कोरोनामुळे बंगालमधील सभा रद्द,इतर पक्ष काय करणार ?

दिल्ली | देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.देशात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे.दुसरीकडे ५ राज्यांच्या निवडणूकीचा प्रचार जोरात सुरू आहे.सभांना लाखो लोकांची गर्दी होत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील पुढच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर इतर पक्षाच्या सर्व राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?

राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की, पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी काय निर्णय घेणार ?

देशात कोरोनाचा हाहा:कार माजला आहे.आणि नेते प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत. बेड,ॲाक्सिजन ,वेंटिलेटर या सगळ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे.लोकांना प्रचंड त्रासांचा सामना करावा लागतोय. तसेच अनेक राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलींमुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये म्हणून राहुल यांनी रॅली न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तर ममता बॅनर्जी या राज्याच्या प्रमुख आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हे दोन जबाबदार नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस दिली जाणार?

News Desk

राज्यात आज ११,०८८ नवे रुग्ण आढळले 

News Desk

…तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk