HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींचे एकदवसीय उपोषण

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजघाटवरील एकदवसीय उपोषणाला सुरुवात झाली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या उपोषणाला सकाळी १० नंतर सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी दलित समाजाने भारत बंद पुकारला होता.

या बंदला मुंबईसह महाराष्ट्र विषेश गालबोट लागले नव्हते. परंतु, देशभरात अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले होते. त्याचे तीव्र पडसाद अनेक पहायला मिळाले. तरीही सरकारने या बंदबाबत कोणताही ठोस निर्णय न दिल्यामुळे दलित समाजात सध्या असंतोष पहायला मिळतोय.

या पार्श्वभूमीवर दलित समाजाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि नेतेही उपोषणात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. तर मुंबईत अमर ज्योतजवळ काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आपल्या कार्यकर्त्यांसह सामुहिक उपोषणाला बसले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस. ए. बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींची मंजुरी

News Desk

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

News Desk

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

News Desk