नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. याचाच एक भाग गुरुवारी पहायला मिळाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक आपल्या ट्विटरवर पोस्ट केले. या पोस्टच्या माध्यमातून कॉंग्रेस अध्यक्षांनी भाजपला कृषी क्षेत्रात आलेल्या अपयशाचा आढावा घेतला आहे.
Mr Modi’s Report Card
State: Karnataka
Sub: Agriculture1. Contribution to Cong State Govts 8,500 Cr Farm Loan waiver = 0 Rs
2. PM’s crop insurance scheme: Farmers suffer; pvt insurance companies make huge profits.
3. No MSP+50%, for Karnataka farmers.
Grade = F pic.twitter.com/SLJBE4cXWC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 3, 2018
कर्नाटकमध्ये भाजपने एक पैशाचीही शेतकरी कर्जमाफी दिली नाही. त्याच बरोबर मोदी सरकारच्या कार्यकाळात पीकविमा योजना देखील अयशस्वी ठरली. त्यामुळे या सर्वाचा फायदा शेतक-यांना नव्हे तर फक्त खाजगी कंपन्यांना झाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. ट्विटमध्ये राहुल गांधीनी हमीभावाच्या मुद्यारुन भाजपावर ताशेरे ओढले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. परंतु राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी कॉंग्रेसवर उलटून टिका केल्याचे पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.