HW Marathi
देश / विदेश राजकारण

कोरोनामूळे नाईलाजास्तव घरी बसलेल्या रेल्वेतील कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार मिळणार

नवी दिल्ली | संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा काल (२४ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, दिल्लीतही रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, जर रेल्वेसेवा बंद केली तर रेल्वेत काम करणाऱ्या लाखे कंत्राटी कामगारांचे काय होणार हा प्रश्न पडला होता. मात्र रेल्वेने या कामगारांना दिलासा देत बंद काळातील त्यांचे संपूर्ण वेतन देण्यात येईल, असे काल (२४ मार्च) जाहीर केले. या संदर्भात रेल्वेने आदेश जारी केले आहेत. रेल्वेत हाऊसकिपिंग सेवा, स्वच्छतासेवा, खानपान विभाग तसेच

अन्य व्यावसायिक सेवा यांच्यासाठी मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी काम करतात. या सगळ्यांना ३१ मार्चपर्यंत सक्तीने घरी बसावे लागत आहे. या कंत्राटी कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होऊ नयेत, यासाठी रेल्वे बोर्डाने हंगामी, कंत्राटी, आऊटसोर्स केलेले अशा सर्व कर्माचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंतचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना १०० टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना काल बांधकाम व्यवसायातील सुमारे ३.५ कोटी कामगारांना अर्थसाह्याची गरज आणि ती त्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल या सर्वांसाठी शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामूळे आता ज्या कंत्राटी कामगारांचे हातावर पोट आहे त्यांचा प्रश्न सुटला आहे.

Related posts

‘खेल ही नहीं, दिल भी जीतिए | वाजपेयी

अपर्णा गोतपागर

मोदीजी…..आज जुमलों की बारीश, राहुल गांधीचा मोदींना चिमटा

News Desk

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

News Desk