HW News Marathi
देश / विदेश

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांची दुसरी बैठकही वगळली

जयपूर | राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज (१४ जुलै) काँग्रेसच्या आमदारांची दुसरी बैठक वगळली. तसेच, त्यांच्यातील असलेला वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क देखील साधला. मात्र, १८ आमदारांसह सचिन पायलट यांनी आजदेखील ही बैठक वगळली आहे.

एका तासाने तहकूब झालेल्या बैठकीच्या अगोदर कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनीही पायलट व त्यांच्या समर्थकांना कॉंग्रेसच्या दुसर्‍या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

काल (१३ जुलै) पहिली सभा संपल्यानंतर अनेक तास बैठकीची घोषणा करण्यात आली. पायलट व अन्य १८ आमदारांनी त्याला वगळले. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पायलट यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता काल सकाळी त्यांनी विधानसभेची पहिली बैठक सोडल्यानंतर राजस्थान युनिटने अधिक कठोर भूमिका घेतली. तसेच, सरकार किंवा पक्षाला कोणीही कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.

आज एका रिसॉर्टमध्ये बैठक आयोजित केली असून कालपासूनच मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि अन्य आमदार तळ ठोकून होते. पायलट यांना दुसरी संधी दिली जात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पायलट यांच्या नेतृत्वात असंतुष्टांना रोखण्याची इच्छा वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याने कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दुसरी सीएलपी बैठक जाहीर केली. काल झालेल्या बैठकीत १२२ पैकी १०६ आमदार उपस्थित होते.

पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी ३० कॉंग्रेसचे आमदार आणि काही अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी विधानसभेत फ्लोर टेस्टची मागणीही केली. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा नाकारला गेल्याने पायलट अस्वस्थ झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

87 वर्षाचा पोस्टमन निघाला 1300 बालकांचा बाप

News Desk

कैफने केले इम्रान खान यांना क्लीन बोल्ड

News Desk

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, जाणून घ्या तारखा

News Desk