HW Marathi
देश / विदेश

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

हरियाणा | हरियाणातील पंचकूला येथील सीबीआय विशेष न्यायालयाने पत्रकार छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीम दोषी याला दोषी ठरविले आले. न्यायालयाकडून या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह ४ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान,  राम रहीमच्या शिक्षेबाबतचा निर्णय १७ जानेवारीला घेण्यात येणार आहे. राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात बलात्कार प्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत आहे.

पत्रकार हत्याप्रकरणाच्या निर्णयादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पंजाब तसेच हरियाणात कडक सुरक्षा बंदोबस्तासह अलर्ट जारी करण्यात आला होता. प्रामुख्याने सुनारिया, सिरसा येथील डेरा डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आणि पंचकूला येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती

Related posts

ताजमहालची निगा राखा नाही, तर पाडून टाका | सर्वोच्च न्यायालय

News Desk

हार्दिक पंड्यांचे आक्षेपार्ह ट्विटबाबत स्पष्टीकरण

News Desk

गुरमीत राम रहीम सनीचाही चाहता

News Desk