HW News Marathi
देश / विदेश

न्यायालयाकडून राम रहिमला जामीन मंजूर, परंतु २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

हरियाणा | हरियाणातील तब्बल ४०० साधूंना नपुंसक बनवण्याच्या बाबतीत पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने 3 ऑगस्ट २०१८ रोजी डेरा सच्चा सौदा राम रहीम विरुद्ध आरोप निश्चित केले होते. परंतु न्यायालयाकडून डेरा सच्चा सौदा राम रहीमला जामीन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपी राम रहीम यांना २० वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे.

डेरा सच्चा सौदा राम रहीम याच्या सोबत डॉ. मोहिन्द्र इसा आणि डॉ. पीआर गर्ग यांनाही ४०० साधूंना नपुंसक बनविण्याच्या बाबतीत आरोपी घोषित करण्यात आले होते. आयपीसी कलम ३२६, ४१७, ५०६ आणि १२०-बी अंतर्गत या तिघांवर आरोप दाखल करण्यात आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र त्यावेळी तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी सात जणांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा कट फसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिली नाही ! अजित पवारांनी केले भाष्य 

News Desk

अन् मजूर झाला करोडपती

News Desk

तुतीय पंथीयांना मानवी  हक्क मिळवून देण्यासाठी संसदेत कायदा करणार – केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले

News Desk