HW News Marathi
देश / विदेश

“आपका नाम है गुलाम इसलिए मैं करता हूं आपको सलाम”, रामदास आठवेंची गुलाम नबींसाठी कविता

नवी दिल्ली | काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांना आज (९ फेब्रुवारी) राज्यसभेतून निरोप देण्यात आला. संसदेत निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी त्यांची खुप स्तुती केली. यावेळी ते भाऊकही झाले होते. यानंतर बोलण्याची वेळ आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची होती. आपल्या शैलीत आठवलेंनी आझाद यांच्यासाठी एक कविता वाचली. कविता वाचल्यानतंर रामदास आठवले म्हणाले, काँग्रेसने तुम्हाला पुन्हा येथे आणले नाही, तर आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला.

गुलाम नबी यांची तारीफ करताना रामदास आठवले म्हणाले, ‘’आपला स्वभाव अत्यंत चांगला आहे. आपण फार मोठ्या मणाचे आहात. आपण पुन्हा या सभागृहात यायला हवे. जर आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. तर तुम्हाला काय त्रास आहे. आपण पुन्हा सभागृहात यायला हवे. हीच आमची इच्छा आहे.

रामदास आठवलेंची कविता –

राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी…

हम मिलते रहेंगे आपको कभी कभी आपका नाम है गुलाम,

इसलिए मैं करता हूं आपको सलाम आपका नाम है गुलाम,

लेकिन आप हमेशा रहे आजाद आप हम सभी को रहेंगे याद 15 अगस्त को देश हुआ आजाद,

लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजाद आप हमेशा रहो आजाद,

हम रहेंगे आपके साथ…

ये अंदर की है बात मोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममतांना मोठा धक्का, राजीव कुमार यांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश

News Desk

“राजीनामा द्या”; दारुण पराभवानंतर ५ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना सोनिया गांधींचा आदेश

Aprna

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk