HW News Marathi
Covid-19

पतंजलीच्या कोरोनिल औषधामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या, कोरोनिलवर टीका करणाऱ्यांना रामदेव बाबांनी दिले प्रत्युत्तर

हरिद्वार | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने लोकांचा जीव मेटाकुटीला आणला आहे. अनेक स्तरांवर कोरोनावर मात करण्यासाठी औषध शोधले जात आहे. अशातच पतंजलीने कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला होता. पतंजलीच्या कोरोनिल औषधामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या. त्यामुळेच आमच्याविरोधात देशभरात एफआयआर दाखल झाल्या, अशा शब्दांमध्ये योगगुरू रामदेव बाबांनी त्यांचा संताप व्यक्त केला. कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर रामदेव बाबा चांगलेच संतापले आहेत. जणू काही आम्ही दहशतवादी आणि देशद्रोही आहोत, अशा प्रकारे आमच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.

कोरोनिलवरून निर्माण झालेल्या वादावर आज (१ जुलै ) रामदेव बाबांनी स्पष्टीकरण दिले ‘नोंदणीपासून ते चाचण्यांपर्यंत सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून आम्ही काहीही गैर केले नाही,’ असा दावा रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी त्यांनी कोरोनिलवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

‘पतंजलीने यू-टर्न घेतल्याचे लोकं म्हणतात. आम्ही कोणतेही संशोधन केले नसल्याचे आरोप करतात. काहींनी थेट माझी जात, धर्म, संन्यास यावरून टीका केली. भारतात आयुर्वेदावर काम करणं म्हणजे जणू काही गुन्हा असल्याचं वातावरण तयार केलं गेलं. आम्हाला आयुर्वेदाच्या माध्यमातून मिळणारं यश पाहून अनेकांना मिरच्या झोंबल्या,’ अशा शब्दांत रामदेव बाबा कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर बरसले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल

News Desk

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणास आयसीएमआर,एन आय व्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र

News Desk

संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका

News Desk