HW News Marathi
क्रीडा

“एकीकडे क्रिकेटचा अन् दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे चालू शकत नाही”- रामदेव बाबा

मुंबई | टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आज भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे या सामन्याकरिता दोन्ही देशांच्या नागरिकांपासून अगदी जगभरात मोठी उत्सुकता असताना दुसरीकडे या दोन्ही देशांमधील संबंधही ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरचा मुद्दा धुमसत असल्याने अनेकांचा आजच्या क्रिकेट सामन्याला विरोधही आहे. त्याचपैकी एक आहेत योगगुरू रामदेव बाबा. “एकीकडे क्रिकेटचा आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे दोन्ही सोबत चालू शकत नाही”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

योगगुरू रामदेव बाबा शनिवारी (२३ ऑक्टोबर) नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आजच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी मत व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे. “सध्या जी स्थिती आहे ती पाहता भारत आणि पाकिस्तानचा सामना अशा परिस्थितीत होणं हा आपलं राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माच्या विरुद्ध आहे. एकीकडे क्रिकेटचा खेळ आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे दोन्ही सोबत चालू शकत नाही”, असं मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

बॉलीवूडने आपला कचरा साफ करावा!

रामदेव बाबांनी यावेळी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. “बॉलिवुडमध्ये जो ड्रग्जचा विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी धोकादायक आहे. नशा करणं ग्लॅमराईज केलं जातंय. ज्यांना आदर्श मानलं जातं त्यांच्याकडूनच आता लोकांना चुकीची प्रेरणा मिळते आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. अन्यथा हे त्यांच्यासाठी आत्मघाती ठरेल”, असं रामदेव बाबा म्हणाले.

“बाबाजी, रुकिये ना!”

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला रामदेव बाबांनी आपला विरोध केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक याविषयी ट्विट करत म्हणाले की, “बाबाजी रुकिये ना”. त्याचसोबत, मालिकांनी “मोदी है तो मुमकिन है” हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ‘किटअप’ चॅलेंज

News Desk

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

swarit