HW News Marathi
देश / विदेश

मेट्रोमधून अपहरण करून तरुणीवर बलात्कार


नवी दिल्ली(वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी असलेल्या सेक्टर ३९ मधून एका महिलेला मेट्रोतून खेचून कारमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला. या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. याबाबत ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

नोएडा या ठिकाणी असलेल्या ‘गोल्फ कोर्स’ मेट्रो स्टेशनवर पीडित महिला मेट्रोची वाट पाहात उभी होती. मेट्रो आल्यावर ती त्यामध्ये चढणार इतक्यात काही नराधम तिथे आले त्यांनी तिला उचलले आणि स्कॉर्पियो कारमध्ये बळजबरीने बसवले. त्यानंतर याच धावत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तमिळनाडूत जलिकट्टूदरम्यान २ जणांचा मृत्यू

News Desk

उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

News Desk

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk