नवी दिल्ली | बहुप्रतीक्षित अशी राफेल लढाऊ विमाने आज (२९ जुलै) भारताच्या अंबाला विमानतळावर दाखल झाली आहेत. फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीतील ५ विमाने पाठविण्यात आली आहेत. भारतीयांकडून मोठ्या उत्साहात या राफेल लढाऊ विमानांचे स्वागत करण्यात आले आहे. राफेल भारतात दाखल होताच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या धाडसाचे, तत्परतेचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक करत राजनाथसिंह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
The Rafale jets were purchased only because PM Shri @narendramodi took the right decision to get these aircrafts through an Inter-Governmental Agreement with France, after the long pending procurement case for them could not progress. I thank him for his courage & decisiveness.
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 29, 2020
“राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात निर्णय घेताना पंतप्रधान मोदींनी दाखवलेल्या धाडसाबद्दल आणि निर्णयक्षमेतबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केवळ पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळेच राफेल लढाऊ विमानांची खरेदी शक्य झाली. राफेल लढाऊ विमानांबद्दलचा प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला होता. हा निर्णय केवळ कागदपत्रांत अडकला होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी फ्रान्स सरकारसोबत करार करताना अत्यंत तत्परता दाखवली आहे”, असे म्हणत राजनाथसिंह यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. त्याचसोबत संरक्षणमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे देखील अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे, संरक्षण मंत्र्यांनी यावेळी फ्रान्सचे देखील आभार मानले आहेत.
I congratulate the IAF on a professionally executed ferry. I am sure that 17 Squadron, the Golden Arrows, will continue to live upto their motto of "Udayam Ajasram". I am extremely happy that IAF’s combat capability has got a timely boost.
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 29, 2020
भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांसाठी करार केला होता. हा करार जवळपास ५९००० कोटी रुपये इतका होता. या लढाऊ विमानांच्या करारानंतर आज पहिल्यांदा पाच राफेल भारतात पोहोचले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय वैमानिकच या विमानाचे उड्डाण करुन ते भारतात आणले आहे.५ राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले होते. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एक दिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत ३ सिंगल सीटर आणि २ डबल सीटर विमाने आहेत.
I congratulate the IAF on a professionally executed ferry. I am sure that 17 Squadron, the Golden Arrows, will continue to live upto their motto of "Udayam Ajasram". I am extremely happy that IAF’s combat capability has got a timely boost.
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.