मुंबई | भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी भारत पुन्हा एकदा आयसीजेमध्ये जाणार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले. पाकिस्तानने आयसीजेचे आदेश पाळावेत. पाकिस्ताने दुसऱ्यांदा काउन्सलर अॅक्सेस देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने झटका दिल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस दिला होता.
Raveesh Kumar, MEA on Pakistan Ministry of Foreign Affairs' statement,"There would be no 2nd consular access to Kulbhushan Jadhav": We will keep trying that judgement of ICJ is fully implemented. We would like to remain in touch with the Pakistani side through diplomatic channels pic.twitter.com/6H0i0BMDVH
— ANI (@ANI) September 12, 2019
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज (१२ सप्टेंबर) साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस दिला जाणार नाही, अशी माहिती दिली. सोमवारी (२ सप्टेंबर) जाधव यांना भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली आहे. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीचे ठिकाण देखील पाकिस्तानने बदलेले होते.
Dr Mohammad Faisal, Spokesperson, Ministry of Foreign Affairs, Pakistan: There would be no second consular access to Kulbhushan Jadhav. (file pic) pic.twitter.com/zthz4Zewfh
— ANI (@ANI) September 12, 2019
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.